
सलमान खानचा ‘सिकंदर’ नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट. परंतु अगदी दोनच दिवसात या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच, बॉक्स ऑफिसवर अस्तित्व सिद्ध करण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. सलमान खान म्हटल्यावर चाहत्यांच्या अपेक्षाही खूप होत्या. परंतु एकूणच सिकंदर पाहिल्यावर प्रेक्षकांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. तोच तोपणामुळे सलमान खान सध्या चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने अतिशय भावनिक मुद्द्याला हात घातला. सलमानने अगदी स्पष्ट सांगितले की, लोकांना असं वाटतं की, मला कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही. पण असं नसून, मलाही माझ्या चित्रपटासाठी पाठिंब्याची गरज आहे. यावेळी सलमान खानने हे देखील कबूल केले की, तो त्याच्या मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे चित्रपट कायम प्रमोट करतो. मुलाखती दरम्यान सलमान म्हणाला, “उनको ऐसा लगता होगा की जरूरत नहीं पडती मुझे. पर ऐसा नहीं हैं, सबको जरूरत पडती है.
‘सिकंदर’च्या रिलीजपूर्वी, सलमान खानला आमिर खानकडून पूर्णपणे पाठिंबा मिळाला होता. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आमिर खान आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांनी प्रमोशनल स्टंट म्हणून मजेदार गप्पा मारल्या. सलीम खान देखील या चर्चेत सामील झाले होते. यावेळी सलीम खान यांनी सलमान आणि आमिर खानच्या आवडत्या चित्रपटांची निवड केली. याच ट्रेलरच्या लाँचच्या वेळी, सलमान खानने नायिका रश्मिका मंदान्ना आणि त्याच्यातील 31 वर्षांच्या वयाच्या अंतराचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यामुळे सलमान चांगलाच चर्चेत आला होता.