
जोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. खुशी कपूर, वेदांग रैना आणि अगस्त्य नंदा यांचाही हा पहिलाच चित्रपट होता, मात्र चाहत्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. आता जोया अख्तरने चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत स्टारकिड्सचा बचाव केला. एका मुलाखतीत बोलताना जोया अख्तरने म्हटले की, ओटीटीऐवजी चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाला असता तर चित्र काहीसे वेगळे असते. त्यामुळे या अपयशाला मी स्वतःलाच जबाबदार धरते. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे सुहाना, खुशी आणि वेदांग यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.