मी महायुतीचा नव्हे तर फक्त अजित पवार गटाचा उमेदवार, नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण

अजित पवारांनी मला अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी महायुतीचा उमेदवार नाही असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले आहे. तसेच अजित पवारांनीच मला राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यास प्रोत्साहन असेही मलिक म्हणाले.

इंडियन एक्सप्रेसला मलिक यांनी मुलाखत दिली आहे. त्यात मलिक म्हणाले की अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहे. मी महायुतीचा उमेदवार नाही. माझी निष्ठा ही अजित पवारांकडे आहे. या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार होतो. माझ्यामुळे पक्षाला कुठलीही अडचण होता कामा नये अशी माझी इच्छा होती. पण अजित पवारांनीच मला राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढायला गळ घातली. असे नवाब मलिक म्हणाले. तसेच अजित पवार गटाच्या पक्षाच्या दररोजच्या कामकाजात मी सहभागी नाही असेही मलिक म्हणाले.