टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद स्ट्रायकर्स संघाचा दणदणीत विजय, तिसऱ्यांना पटकावले विजेतेपद

क्लिअर प्रिमियम वॉटर पुरस्कृत टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमात अंतिम लढतीत हैदराबाद स्ट्रायकर्स संघाने यश मुंबई ईगल्स संघाचा 51-44 असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. हैदराबाद स्ट्रायकर्स संघाकडून हॅरिएट डार्ट, बेंजमिन लॉक, विष्णू वर्धन यांनी संघाच्या विजय मोलाचा वाटा उचलला.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला एकेरीत हैदराबादच्या हॅरिएट डार्टने मुंबईच्या झायनेप सोंमेझचा 14-11 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. पुरुष एकेरीत मुंबईच्या करण सिंगने हैदराबादच्या बेंजमिन लॉकचा 14-11 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत हैदराबादच्या हॅरिएट डार्टने विष्णू वर्धनच्या साथीत मुंबईच्या झायनेप सोंमेझ व जीवन नेद्दुचेझियनचा 16-9 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या चुरशीच्या पुरुष दुहेरीच्या लढतीत मुंबईच्या करण सिंग व जीवन ने द्दुचेझियन यांनी कडवी झुंज दिली. पण हैद्राबादच्या बेंजमिन लॉक व विष्णू वर्धन यांनी मुंबईच्या करण सिंग व जीवन ने द्दुचेझियन यांना 10-10 असे बरोबरीत रोखले.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत हैदराबाद स्ट्रायकर्स संघाने राजस्थान रेंजर्स संघाचा 51-42 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत हैदराबादच्या हॅरिएट डार्टने क्रिस्टिना दिनूचा 14-11 असा तर राजस्थानच्या आर्थूर फेरी याने हैदराबादच्या बेंजमिन लॉकचा 13-12 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत हॅरिएट डार्टने विष्णू वर्धनच्या साथीत क्रिस्टिना दिनू व रोहन बोपण्णा यांचा 15-10 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत विष्णू वर्धन व बेजंमिन लॉक यांनी राजस्थानच्या रोहन बोपण्णा व आर्थुर् फेरी यांचा 10-8 असा पराभव केला.