
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करताना ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँर्डने (बीआयएस) प्रमाणित केलेल्या वस्तूच ग्राहकांनी खरेदी कराव्यात, असे आवाहन केले जाते. मात्र तरीही ग्राहकांची फसवणूक होते. याला आळा घालण्यासाठी हैदराबाद येथील बीआयएस टीमने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. नुकतीच बीआयएसने बशीरबाग येथील फॅक्टरीवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात हॅण्डब्लेंडर जप्त केले. हे हॅण्डब्लेंडर नियमबाह्य विक्रीला नेले जाणार होते. हॅण्डब्लेंडरवर कोणतेही बीआयएस मार्ंकग नव्हते. तब्बल 77 लाखांहून अधिक किमतीचे सुमारे 2635 हॅण्डब्लेंडर कारवाईत जप्त करण्यात आले. स्मूदी, शेक आणि अन्य पेय पदार्थ तयार करण्यासाठी या हॅण्डब्लेंडरचा उपयोग होतो. हे केवळ नियमाचे उल्लंघन नसून ग्राहकांच्या सुरक्षितेतचा गहन विषय आहे, असे बीआयएस हैदराबादचे अध्यक्ष पी. व्ही. श्रीकांत यांनी सांगितले.