विम्याच्या पैशासाठी बायकोला समुद्रात फेकले!

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी आधी बायकोच्या नावाने 150 कोटी रुपयांचा विमा काढला. त्यानंतर तिला समुद्रात फेकून दिले. दुर्घटना झाल्याचा दावा करत 150 कोटी रुपये मिळवले, परंतु हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर कोर्टाने दोषी ठरवत या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. चीनमधील लियाओनिंग प्रांतात ही घटना उघडकीस आली आहे. ली असे या व्यक्तीचे नाव असून तो 47 वर्षांचा आहे. 2021 मध्ये त्याने हा सर्व प्रकार केला होता. ली याने पत्नीच्या नावाने चार विमा पॉलिसी काढल्या. त्याचा वारस म्हणून स्वतःच्या नावाची नोंद केली होती.

लग्नाच्या दोन महिन्यांतच विमा पॉलिसी

ली हा एक रेस्टॉरेंट चालवत होता. तो नेहमी आपल्या कर्मचारी तसेच मालाचा पुरवठा करणाऱ्या लोकांना वेळेवर पैसे देत नव्हता. त्याच्यावर भरमसाट कर्जही झाले होते. त्याने ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले. ज्या महिलेशी लग्न केले, तिचा आधीच घटस्फोट झालेला होता. तिला दोन मुलेही होती. लग्नाच्या दोन महिन्यांतच त्याने पत्नीच्या नावावर चार विमा पॉलिसी काढल्या.