
‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025’ आज जाहीर झाली. यामध्ये जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत हिंदुस्थानच्या उद्योजिका रोशनी नाडर यांनी बाजी मारली आहे. जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत त्या पाचव्या क्रमांकावर पोचल्या आहेत. त्यांच्याकडे 3.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. रोशनी नाडर या हिंदुस्थानच्या उद्योजिका आणि एचसीएल पंपनीच्या प्रमुख आहेत. त्यांचे वडील शिव नाडर यांनी एचसीएलमधील 47 टक्के भागीदारी रोशनी यांच्या नावावर केल्यानंतर त्यांचा क्रमांक श्रीमंतांच्या यादीत वर सरकला आहे. जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांच्या यादीत नाव समाविष्ट होणाऱ्या त्या पहिल्याच हिंदुस्थानी महिला आहेत. यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे स्थान अढळ आहे. विशेष म्हणजे, मस्क यांची संपत्ती 82 टक्क्यांनी आश्चर्यकारकरीत्या वाढली आहे. आता त्यांच्याकडे 420 बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
मुकेश अंबानी यांची जागतिक यादीतून पिछेहाट झाली असली तरी ते अद्याप आशिया आणि हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी कुटुंबियांकडे 8.6 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.