हिंदुस्थानी अब्जाधीशांची परदेशाला पसंती

नुकतीच ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025’ जाहीर झाली. त्यामध्ये असे दिसून आलेय की, हिंदुस्थानात जन्मलेले 42 अब्जाधीश परदेशामध्ये राहतात. परदेशांतील अर्थव्यवस्थेत या उद्योगपतींचा मोठा वाटा आहे. लक्ष्मी मित्तल आणि अनिल अगरवाल दोघे यूकेमध्ये राहतात. जय चौधरी, विवेक रणदिवे अमेरिकेत राहतात. या अब्जाधीशांचे मूळ हिंदुस्थान आहे, पण त्यांची संपत्ती परदेशात विस्तारली आहे. उलटपक्षी हिंदुस्थानात केवळ सहा विदेशी अब्जाधीश राहतात. जगात ही  संख्या सर्वात कमी आहे. अमेरिका आणि यूकेच्या अर्थव्यवस्थेत विदेश अब्जाधीशांना मोठा वाटा आहे. अमेरिकेत विविध देशांतील 206 स्थलांतरित अब्जाधीश राहतात, तर यूकेमध्ये 76 जण राहतात. चीनचे 66 अब्जाधीश विदेशांमध्ये राहतात, तर चीनमध्ये 10 परदेशी अब्जाधीश वास्तव्य करून आहेत.

l हिंदुस्थानातील बहुसंख्य अब्जाधीश अमेरिका, यूके, यूएईमध्ये राहतात. तंत्रज्ञान, अर्थ, मेटल अशा सेक्टरमधील उद्योगपती परदेशात स्थिरस्थावर आहेत.

l अर्थव्यवस्थेत वृद्धी होत असतानाही हिंदुस्थानात  विदेशी उद्योगपती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वास्तव्याला आहेत. फक्त सहा परदेशी अब्जाधीश हिंदुस्थानात राहतात. तेदेखील त्यांचा दीर्घकाळाचा व्यवसाय असल्यामुळे किंवा  कुटुंबीय टायअपमधून राहत असल्याचे दिसून येतंय. याच्या उलट स्वित्झर्लंडमध्ये 73 विदेशी अब्जाधीश राहत आहेत. यूएईमध्ये डझनभर आहेत. ऑस्ट्रेलियाही अनेक उद्योगपतींना आकर्षित करत आहे.