गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ; दक्षिण, मध्य गुजरात जिल्ह्यांमधील अनेक शहरात पाणी तुंबले, रस्ते-रेल्वे प्रभावित

फोटो - PTI

बुधवारच्या मुसळधार पावसाने गुजरातच्या अनेक भागांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं आहे. तर धरणंही ओसंडून वाहत आहेत. यामुळे अनेक गावे तुटल्याने आणि सखल भागात पाणी शिरल्याने शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरत, भरूच आणि आणंद सारख्या दक्षिण आणि मध्य गुजरात जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. काही भागात रेल्वे सेवाही प्रभावित झाल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.