शेकडो कंत्राटी कामगारांचा भारतीय कामगार सेनेत प्रवेश

शिवसेना नेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथील पार्ले बिस्कीट लिमिटेड कंपनीत काम करणारे प्लेन्टिटय़ूड सर्व्हिसेस आणि काथवले लेबर कन्सल्टंट सर्व्हिसेस कंपनीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला.

कंत्राटी कामगारांनी भारतीय कामगार सेनेत प्रवेश केल्यानंतर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भारतीय कामगार सेनेचे फलक लावून त्याचे अनावरण भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गेट मीटिंग घेऊन कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी चिटणीस सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस दिनेश पाटील, ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली-खालापूर सरपंच प्रमोद शिर्पे, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर ठाकरे, योगेश ठाकरे, सर्व युनिट कमिटी सदस्य व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

एकजुटीने लढणार
पार्ले कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना होणारा त्रास, कामगारांची एकी तोडण्याचा केलेला प्रयत्न यावर संजय कदम यांनी भाष्य करत व्यवस्थापनाच्या विरोधात आपल्या न्याय्य आणि हक्कासाठी लढा देताना कामगारांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले.