मानवी तस्करीच्या रॅकेटच्या माध्यमातून तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारीत ढकलणाऱया रॅकेटप्रकरणी आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहा राज्यांतील 22 ठिकाणी छापेमारी केली. यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाब येथील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणात एजंट्स, सहकारी आणि कंबोडिया येथील हिंदुस्थानी एजंट्स यांचा समावेश असून ईशान्येकडील देशांमध्ये तरुणांची तस्करी करण्याचे रॅकेट चालवण्यात येत असल्याचा संशय आहे, असे एनआयएच्या अधिकाऱयांनी सांगितले. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱया तरुणांना मानवी तस्करीच्या जाळय़ात ओढले जायचे. छापेमारीत विविध डिजिटल पुरावे, मोबाइल फोन्स, हार्ड ड्राइव्ह, मेमोरी कार्ड, लॅपटॉप, अवैध मालमत्ता आणि आर्थिक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर 34.80 लाख रुपयेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.