सांताक्रुझ येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेना हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिट आणि ग्रॅण्ड हयात मॅनेजमेंट यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. शिबिरात हॉटेलमधील सुमारे 250 कर्मचाऱयांनी रक्तदान केले.
ग्रॅण्ड हयातमध्ये दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यात रक्तदान शिबीर होते. शेतकरी मदतनिधी उभारला जातो. गुढीपाडवा साजरा होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जाते. युनिटच्या वतीने शिवसेना मदतनिधीला पाच लाखांची मदत दिली जाते. विविध समाजोपयोगी उपक्रमांचे काwतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी करतात आणि प्रोत्साहन देतात. मुंबईतील वाढत्या रक्त तुटवडय़ाची गरज पाहता भारतीय कामगार सेना ग्रॅण्ड हयात युनिटच्या वतीने चिटणीस मनोज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही ग्रॅण्ड हयातमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराला शिवसेना नेते-भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, युवासेना-शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहिर, चिटणीस योगेश आवळे, संतोष कदम आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन युनिट सरचिटणीस प्रशांत नाईक, उपाध्यक्ष सिद्धेश पांढरकामे, खजिनदार कुश गवस, कार्यकारिणी सदस्य अभय प्रभू, संदेश परब, संजय पाते, प्राजक्त तेली, हीना शेख, मेघना पांडिलवार यांनी केले होते.