मुंब्रामध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
आज मुंब्र्यातील कौसा भागात दुपारी साडे तीनच्या सुमारास होर्डिंग कोसळलं. या वेळी मुंब्र्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत होता. त्यावेळी हा होर्डिंग कोसळला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, पण या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना याबाबत कळवताच त्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. होर्डिंग हटवून पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर केली.
मुंब्रामध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.#mumbra pic.twitter.com/xoBVsinx17
— Saamana (@SaamanaOnline) September 16, 2024
या प्रकरणी मुंब्रा वासियांनी ठाणे महानगरपालिकेविरोधात रोष व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्ये असेच होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी बेकायदेशीर आणि धोकायदाक होर्डिंग हटवण्यात आले होते. आता मुंब्र्यातही असे होर्डिंग कोसळल्यानंतर स्थानिकांमध्ये राग आहे. संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे.