
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक केली आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी आकारण्यात येणाऱया दरांवरून वाद सुरू झाला आहे. गुजरातमध्ये 200 रुपयांना मिळणारी नंबर प्लेट महाराष्ट्र 450 रुपयांना का, असा सवाल केला जात आहे. भाजपच्या सत्ताकाळात जनतेची लूट सुरू आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.