HSC Result 2024 : उद्या दुपारी एक वाजता लागणार बारावीचा निकाल, बोर्डाने दिली मोठी अपडेट

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आणि धाकधूक आता वाढली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आता या परीक्षेचा निकाल उद्या ( 21 मे 2024 ) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये हा निकाल लागणार आहे.

इथे पाहा निकाल…

> mahresult.nic.in
> http://hscresult.mkcl.org
> www.mahahsscboard.in
> https://results.digilocker.gov.in
> http://results.targetpublications.org

वरील वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.