Jharkhand: हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे 18 डबे रुळावरून घसरले, दोन प्रवाशांचा मृत्यू

Howara-CSMT Express derailed

झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून  20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

चक्रधरपूरजवळील बारा बांबू गावात हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. गाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेसंदर्भात अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नसली तरी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सुदैवानं आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गाडी रुळावरून घसरण्याचे कारण स्पष्ट नसून त्याचा तपास सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

एका अधिकृत निवेदनात, हिंदुस्थानी रेल्वेनं म्हटलं आहे की, ‘गाडी क्रमांक 12810 हावारा-सीएसएमटी एक्स्प्रेस चक्रधरपूर विभागातील राजखर्सवान वेस्ट आऊटर आणि बारा बांबू दरम्यान चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली आहे’.

‘कर्मचाऱ्यांसह एआरएमई आणि एडीआरएम सीकेपी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 6 जण जखमी झाले आहेत. सर्वांवर रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आहेत’, असंही त्या निवेदनात म्हटलं आहे.

हेल्पलाइन क्रमांक केले जारी

ट्रेन रुळावरून घसरल्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने काही आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत –

Tatanagar: 06572290324
Chakradharpur: 06587 238072
Rourkela: 06612501072, 06612500244
Howrah: 9433357920, 03326382217
Ranchi: 0651-27-87115
HWH Help Desk: 033-26382217, 9433357920
SHM Help Desk: 6295531471, 7595074427
KGP Help Desk: 03222-293764
CSMT Helpline Auto no 55993
P&T: 022-22694040
Mumbai: 022-22694040
Nagpur: 7757912790