
आजही आपल्याला अनेकजण सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणारे आढळतात. कोमट पाणी पिणे हे केव्हाही हितकारक. कोमट पाणी पिण्यामुळे आपला कोटा तर साफ होतोच, शिवाय वजनही चांगलेच कमी होते. सकाळी पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. मुख्य म्हणजे आपल्याला पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो. तसेच पोट साफ होण्यासाठी कोमट पाणी हे खूपच गुणकारी आहे. कोमट पाण्याची पोट साफ करण्यात याची अत्यंत महत्वपूर्ण मदत होते.
सकाळी कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. दिवसाच्या सुरुवातीला एक किंवा दोन लीटर पाणी प्यायल्यामुळे शरीर निरोगी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली त्वचाही उत्तम राहते.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनपासून त्वचेचे संरक्षण होते. तसेच आपली त्वचा चमकदार होते. किमान 5 लीटर पाणी आपल्या पोटात जायलाच हवे. त्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर निघून जातात. तसेच आपल्या त्वचेला कोरडेपणाची समस्या असेल तर तिही समस्या दूर होते.
मध आणि लिंबू पाणी हा सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासही हे पाणी खूपच उपयुक्त आहे. मधामध्ये एंटी-एजिंग पोषक तत्वे असतात, त्याचबरोबरीने लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असते.
अनेकजण सकाळी उठून फळांचा रसही घेतात. फळांच्या रसामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन व इतर पोषक तत्वे असतात. गाजर, बिट, डाळिंब आणि सफरचंदमध्ये खूप प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे ही फळे खाण्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर लाभ होतो. तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)