आई झाल्यानंतर वाढत्या वजनाचे टेन्शन घेऊ नका.. वजन कमी करण्यासाठी करा हे उपाय

प्रसूतीनंतर वाढलेले वजन कसे कमी करायचे असा प्रश्न बहुतांशी महिलांना सतावतो. यावर काहीजणी बारीक होण्यासाठी जिममध्ये जाण्याचा विचार करतात. तर काही आहारतज्ज्ञांकडून स्वतःसाठी खास आहार बनवून त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. सोप्या मार्गांनी घरी राहूनही तुम्ही बाळ झाल्यानंतर वजन नैसर्गिकरित्या कमी करू शकता.

ताजी फळे आणि भाज्या खा, कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. आहारात संपूर्ण धान्य ब्रेड, ब्राऊन राइस यांचा समावेश करा. जास्त साखरयुक्त पेयांपासून दूर राहा आणि तुमच्या आहारात मांस, चिकन, अंडी, दही आणि दूध यासारख्या प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करा.

 

प्रसूतीदरम्यान महिलांना होणार्‍या वेदना आणि थकवा यातून बरे होण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा थकवा मूल 2 किंवा 3 महिन्यांचे होईपर्यंत टिकते. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन आपले वजन आणि कॅलरीजचे प्रमाण यावर लक्ष ठेवावे.

स्तनपान करणाऱ्या महिलांनी क्रॅश डाएट सुरू केल्यास त्याचा आईच्या दुधावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळत नाही. बाळाच्या पोषणाचा एकमेव मार्ग म्हणजे आईचे दूध. बाळंतपणानंतर शरीरात खूप अशक्तपणा येतो, त्यामुळे तुमच्या जुन्या रुटीनमध्ये येण्यापूर्वी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुमची सामान्य प्रसूती झाली असेल, तर तुम्ही 20 दिवसांनंतर थोडेसे काम सुरू करू शकता. त्वचेची काळजी, वजन कमी करण्यासाठी आणि बाळाच्या योग्य विकासासाठी जास्त पाणी पिणे खूप चांगले मानले जाते. ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत, त्यांनी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे कारण स्तनामध्ये तयार होणारे दूध 50% पाणी असते.

 

आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी स्तनपान फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. हे महिलांना वजन कमी करण्यास देखील मदत करते कारण ते दिवसाला 850 कॅलरीज कमी करते, परंतु स्तनपान केल्याने कधीकधी वजन वाढूही शकते. याचे कारण असे की स्तनपानानंतर तुम्हाला खूप भूक लागते आणि तुमचा जास्त आहार घेण्याकडे कल असतो. जर तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करून जास्त खाण्यापासून दूर राहिलात, तर स्तनपान वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते.