वैद्यकीय खर्चाचा भार पडू नये म्हणून आपल्यापैकी अनेक जण आरोग्य विमा पॉलिसी घेतात. विमा खरेदीदारांना पोर्टेबिलिटी अधिकार दिले आहेत. म्हणजे विमाधारक त्यांची पॉलिसी विद्यमान कंपनीकडून इतर कोणत्याही कंपनीकडे वळवू शकतात. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने 2011 पासून विमा खरेदीदारांना पोर्टेबिलिटी अधिकार दिले आहेत. विमा पोर्टेबिलिटीसाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नसते. तसेच जुन्या पॉलिसीच्या बेनिफिटमध्ये नुकसान होत नाही.
पोर्टेबिलिटी कधी निवडाल
- जर विमाधारक त्याच्या विमा कंपनीच्या सेवेशी किंवा दाव्याच्या निपटारा प्रक्रियेशी समाधानी नसेल.
- इतर कोणतीही कंपनी अधिक कव्हरेज किंवा कमी प्रीमियम ऑफर करत असल्यास.
- पॉलिसीधारकाच्या नवीन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कंपनीकडे चांगले कव्हरेज असल्यास…
पोर्ट करताना काय लक्षात ठेवावे?
- नियमांनुसार, तुम्हाला पॉलिसी पोर्टेबिलिटी प्रक्रिया करायची असेल तर पॉलिसी नूतनीकरणाच्या तारखेच्या 45 दिवस आधी करणे बंधनकारक आहे.
- नवीन आणि जुन्या कंपनीच्या कव्हरेजची तुलना करा. नवीन पॉलिसीमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले सर्व फायदे समाविष्ट असल्याची खात्री करा.