
सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण होममेड फेसपॅक वापरण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. केमिकल मिश्रित फेसपॅकमुळे त्वचेला इजा होण्याचा संभव असतो. तसेच प्रत्येक वेळी आपण तो खर्च उगाच का वाढवायचा असाही विचार आपण करायला हवा. विशेष म्हणजे केमिकलयुक्त प्रसाधने तात्पुरता फायदा नक्कीच देतात. त्यानंतर मात्र त्वचा खराब होण्यास सुरूवात होते. म्हणूनच साधे सोपे आणि घरगुती उपाय करणे हे केव्हाही बेस्ट.
आपल्या आवाक्यात असतात अशा गोष्टींचा वापर करून आपण आपली त्वचा निरोगी ठेवू शकतो. सुंदर नितळ कांती मिळविण्यासाठी आज आपण पाहुया एक खास फेसपॅक पाहुया.
कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक हा त्वचेला अतिशय तजेला देतो. तसेच यामुळे कांती नितळ होते. मुख्य म्हणजे त्वचेला चकाकीही लाभते.
कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी, आपण सर्वात आधी कलिंगड आणि काकडीचा रस घ्यायला हवा. त्यानंतर दोन्ही रस नीट मिक्स करावेत.
चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे हा रस तसाच लावून ठेवावा त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.
कलिगंडासोबत आपण दूधाचाही फेसपॅक बनवू शकतो. याकरता आपण कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करायचे.
हे मिश्रण किमान 25 ते 30 मिनिटे चेहरा तसेच मानेला लावून ठेवावे. किमान अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
कलिंगडाच्या रसामुळे त्वचेला एक चकाकी प्राप्त होते. चेहरावरील रंध्रे उघडी होण्यास मदत होतात. एकूणच काय तर चेहरा आणि पेशींचे आरोग्य सुधारण्यास कलिंगडाचा रस हा अतिशय महत्त्वाचा आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)