![465983794_18466323244006330_5315758339123206174_n](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/465983794_18466323244006330_5315758339123206174_n-696x870.jpg)
ट्रान्सपरंट साडी नेसण्याची एक ठराविक पद्धत असते. त्यामुळे ही साडी नेसताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. ही साडी नेसण्याची योग्य पद्धत माहीत असल्याशिवाय, या साडीच्या वाट्याला जाऊच नये. ज्या मुलींना किंवा महिलांना साडीच्या बाबतीत जागरुकता आणि उत्तम फॅशनची जाण आहे, अशांसाठी ही साडी एक उत्तम पर्याय आहे.
ट्रान्सपरंट साडी नेसताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे ब्लाऊज कोणता घालताय हे महत्त्वाचे आहे. ब्लाऊजची निवड योग्य केली तर, ही साडी नेसण्याचा मार्ग मोकळा. ट्रान्सपरंट साडीवर मुख्यत्वे हेवी ब्लाऊजची निवड करावी. म्हणजे साडी आणि ब्लाऊज दोन्ही उठून दिसेल. स्लीवलेस ब्लाऊजही या साड्यांवर घालता येऊ शकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेटीकोट.. ट्रान्सपरंट साडी घालताना पेटीकोट कोणता असायला हवा हे जाणीवपूर्वक लक्ष द्या. खास फॅशनबेल पेटीकोट बाजारात उपलब्ध असतात. ट्रान्सपरंट साडीसाठी पेटीकोट निवडताना, फॅशनेबल पेटीकोटची निवड करणे गरजेचे आहे.
पदर
ट्रान्सपरंट साडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर, पदर मोकळा ठेवणं सर्वात उत्तम. त्यामुळे या साडीचा लूक अधिक खुलून दिसतो.