
शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत मेंदूचे योग्यरित्या कार्य करणे खूप महत्वाचे आहे. मेंदू योग्यरित्या कार्य करत नसेल तर, जगणे केवळ कठीणच नाही तर अशक्य होते. लहान मुलांचा मेंदू खूप वेगाने काम करतो, परंतु जसजसे ते मोठे होतात तसतसे मेंदू कमकुवत होऊ लागतो. वाढत्या वयानुसार मेंदू कमकुवत होण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैली, दैनंदिन ताणतणाव आणि प्रदूषण. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे व्यायाम आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मन निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे आहे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही टिप्स या खूपच गरजेच्या आहेत त्याच आपण पाहुया.
संगीत
संगीत ऐकल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, संगीत ऐकल्याने मेंदूचा तो भाग सक्रिय होतो जो स्मृती, भावना, वेगाला नियंत्रित करतो. तज्ज्ञांच्या मते, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी दररोज थोडा वेळ संगीत ऐकणे महत्त्वाचे आहे.
नवीन कौशल्ये शिकणे
आपण एखादे नवीन कौशल्य शिकतो तेव्हा मेंदूमध्ये नवीन कृती क्षमता आणि नवीन कनेक्शन तयार होतात. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकणे हे गरजेचे आहे.
ध्यानधारणा
ध्यानामुळे चिंता आणि ताण कमी होण्यास देखील मदत होते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की दररोज फक्त २० ते २५ मिनिटे ध्यान केल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात.