
तुम्ही खाण्यापिण्याची योग्य वेळ ऐकली असेल, पण पाणी पिण्याची योग्य वेळ किंवा पद्धत कधी ऐकली आहे का? नसेल तर आजच जाणून घ्या. खरं तर, पिण्याच्या पाण्याशी संबंधित अनेक सूचना आहेत, ज्या आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून आपण ऐकतो. आयुर्वेदानुसार आपण कोणत्या पद्धतीने पाणी पितो यावर आपल्या शरीरावर अनुकूल किंवा प्रतिकुल परीणाम होत असतात.
चला तर मग, जाणून घेऊया पाणी पिण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत आणि पाणी कधी आणि केव्हा पिणे आरोग्यासाठी चांगले असू शकते.
पाणी पिताना या टिप्स अवलंबा
कधीही उभे राहण्याऐवजी बसून पाणी पिणे केव्हाही हितावह आहे. बसून पाणी प्यायल्याने मज्जासंस्था आणि स्नायू शिथिल होतात आणि पाणी पोटातील द्रवांमध्ये सहज मिसळते.
उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडते त्यामुळे सांधेदुखी होऊ शकते.
एखादी व्यक्ती आंघोळ करून बाहेर येते तेव्हा त्याचा रक्तदाब वाढतो. एक ग्लास पाणी पिण्याने रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि रक्तदाब संतुलित करण्यास मदत होते, म्हणून आंघोळीनंतर पाणी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. तसेच, थंड पाण्यामुळे शरीराच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. म्हणूनच रुम टेम्प्रेचर असलेले पाणी किंवा कोमट पाणी हे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.
सकाळी उठल्याबरोबर काही खाण्यापूर्वी किंवा शौचास जाण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्यही उत्तम राहते.
(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. )