
दिवसभर ऑफिसच्या डेडलाइन, प्रवास आणि इतर अनेक गोष्टींना सामोरे गेल्यानंतर, रात्री आपल्यामध्ये त्राण उरत नाही. याच तणावपूर्ण दिवसानंतर रात्री आपण किमान 10 ते 15 मिनिटे स्वतःला द्यायलाच हवीत. परंतु अनेकदा तर आपल्याला रिलॅक्स व्हायलाच वेळ मिळत नाही. त्यामुळेच मग आपला चेहराही खराब दिसू लागतो. त्यामुळेच आपण असे उपाय बघुया जे आपण आठवड्यातून किमान एकदा तरी करायला हवेत. जेणेकरून आपल्याला रिलॅक्स राहण्यासाठी मदत होईल.
केसांना तेल लावणे
केसांना तेल लावणे हा एक साधा सोपा उपाय आपण अगदी घरच्या घरी करु शकतो. खासकरुन कामावरुन आल्यानंतर, केसांना १० मिनिटे तेल लावल्याने मन शांत होण्यास मदत होते. याकरता कोकोनट आॅइल, ऑलिव्ह, बदाम किंवा इतर कोणतेही तेल वापरु शकतो. दररोज किमान 10 मिनिटे केसांना तेलाने मालिश केली तर केस मजबूत होतातच शिवाय डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.
फेसशीट मास्कअलीकडे चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणि कमी वेळात चमक मिळवण्यासाठी फेसशीट मास्क खूप ट्रेंडी आहेत. स्पासारखा आराम हवा असेल तर, बाजारात उपलब्ध असलेले फेसशीट मास्क वापरून पाहू शकता. हा शीट मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्ही आरामात बसा. बाजारात उपलब्ध असलेले फेसशीट मास्क खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात अनेक प्रकारची रसायने असतात, म्हणून तुमच्या त्वचेचा प्रकार पाहूनच फेसशीट मास्क खरेदी करा. तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि सौंदर्यप्रसाधने शोषू शकत नसेल तर फेसशीट मास्क वापरू नका.
स्पा बाथ
स्पासारखा आराम मिळवण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो. स्पा बाथ आपण घरच्या घरी सुद्धा करु शकतो. औषधी तेल, ड्राय ब्रश वापरुन आपण स्पासारखी ट्रिटमेंट घरी घेऊ शकतो. स्पा बाथ घेतल्यानंतर, डोळे मिटून थोडा वेळ एकटे बसा. यामुळे मन शांत होईल आणि शरीरालाही आराम मिळेल.
ऑइल स्पा मसाज
शरीर आणि मनाला आराम देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऑइल स्पा मसाज. हा मसाज प्रत्येक स्त्री पुरुषांची पहिली पसंती मानली जाते, कारण ते अगदी कमी खर्चात घरी सहज करता येते. ऑइल स्पा मसाजसाठी, प्रथम एका भांड्यात थोडे बॉडी ऑइल घ्या. त्यात थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळा. बॉडी ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल मिसळल्यानंतर, या तेलाने तुमचे पाय, हात आणि खांदे मसाज करा. मालिश केल्याने तुमच्या शरीराचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला बराच काळ ऊर्जा मिळाल्यासारखे वाटेल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)