
मेकअप आपले सौंदर्य अधिक खुलवतो, म्हणूनच मेकअप करणं हा स्त्रियांचा आवडता प्रांत आहे. नेहमी मेकअप करणाऱ्यांमध्ये आणि नवख्यांमध्ये मेकअप करताना लगेचच फरक जाणवतो. कधीकधी मेकअप करतात त्यांना मेकअपबद्दल काही मूलभूत गोष्टी या माहित असायला हव्यात. म्हणजे मेकअप करताना कुठेही त्रुटी राहणार नाहीत. मेकअप करणे काही लोकांना सोपे वाटत असले तरी, ती एक कला आहे.
मेकअप बेसिक टिप्स
सर्वात आधी चेहरा धुवा. यानंतर, क्लीन्सरने खोलवर स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर निवडा.
चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर, 10 सेकंद थांबा जेणेकरून त्वचा ओलावा योग्यरित्या शोषू शकेल. यानंतर प्रायमर वापरा. या दोन्ही गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन बेस योग्यरित्या मिसळण्यास मदत करतात.
तुम्हाला आयशॅडो लावायचा असेल तर फाउंडेशन लावण्यापूर्वी तो लावा. डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर गरज असेल तिथे कलर करेक्टर लावा, कन्सीलर लावा आणि नंतर डोळ्यांचा मेकअप करा. यानंतरच फाउंडेशन लावावे. यामुळे, जर शॅडो, लाइनर, मस्कारा यासारख्या गोष्टी चेहऱ्यावर पडल्या तर त्या फाउंडेशनने झाकल्या जातात.
तुमचा मेकअप बेस परिपूर्ण आहे याची खात्री करण्यासाठी, फाउंडेशन चांगले मिसळणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर खूप कमी किंवा जास्त फाउंडेशन लावू नका हे लक्षात ठेवा.
संपूर्ण चेहऱ्यावर चांगले कव्हरेज मिळावे म्हणून मर्यादित प्रमाणात फाउंडेशन घ्या. यानंतर, ब्युटी ब्लेंडरने टॅप करून फाउंडेशन पसरवा. या टप्प्यावर, ब्लेंडर चेहऱ्यावर अजिबात घासू नका.
तुम्ही पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर ब्युटी ब्लेंडर पाण्यात भिजवा, चांगले पिळून घ्या आणि हवेत सुकू द्या. जेव्हा त्यात पाणी शिल्लक नसेल आणि थोडासा ओलावा असेल, तेव्हा त्यात बेस मिसळा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)