Watermelon Buying Tips- कलिंगड विकत घेताना ते लालबुंद आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या या टिप्स

उन्हाळा आणि कलिंगड यांचं एक अनोखं नातं आहे. उन्हाळ्यात रस्त्यावर कलिंगडाची रास विकण्यासाठी दिसल्यावर आपले पाय आपसुक कलिंगड विकत घेण्यासाठी वळतात. परंतु अनेकदा कलिंगड विकत घेताना तुम्हालाही फसल्यासारखे होते का.. कलिंगड विकत घेताना कधीतरी ते आतून अर्धेअधिक पांढरे निघते. तर कधी आतून पिवळसरही असते. अशावेळी कलिंगड विकत घेताना काही गोष्टी या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कलिंगड घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर, कलिंगड घेणे हे अगदी सोपे होईल.

 

 

कलिंगड विकत घेताना काय लक्षात ठेवावे

कलिंगड हातात घेऊन सर्वात आधी ठोकून बघावे. कलिंगड आतून पिकलेले असेल तर आवाज येईल. समजा बाहेरून ठोकल्यानंतर आवाज नाही आला तर समजायचे कलिंगड कच्चे आहे.

वजनाला हलके कलिंगड असेल तर ते अजिबात घेऊ नये.

 

कलिंगडाची वरची साल पूर्णपणे काळपट हिरवी असायला हवी हे लक्षात ठेवा.

 

कलिंगडावर थोडासा पिवळसर डाग असेल तर, ते कलिंगड आतून लाल असणार हे नक्की.

 

कलिंगड घेताना गोलसर किंवा अंडाकृती आकाराचे कलिंगड निवडावे.

 

कलिंगड घेताना दोन कलिंगड हातात आळीपाळीने घेऊन बघावे. कलिंगड हाताला जड मजबूत लागला तर तो कलिंगड चांगला आहे असे समजावे.

 

कलिंगड वजनाला हलका लागल्यास तो कलिंगड विकत घेऊ नये.

 

कलिंगडाला बाहेरुन मारल्यानंतर त्यातून हलका आवाज आला तर तो कलिंगड घेऊ नये.