
दात घासणे हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सकाळी उठल्यानंतरचा महत्त्वाचा कार्यभाग. पूर्वीच्या काळात लोक दातुनने दात स्वच्छ करायचे पण आज दातुनने दात स्वच्छ करणारा क्वचितच कोणी असेल. आता जवळजवळ प्रत्येकजण टूथब्रशने दात स्वच्छ करतो. टूथब्रशचे दात हे प्लास्टिक किंवा रबरपासून बनवलेले असतात. प्लास्टिक तरीही खराब होते. अशा परिस्थितीत, टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? हे महत्वाचे आहे. टुथब्रश न बदलल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो.
टूथब्रश किमान दोन महिन्यांनी बदलणे हे खूप गरजेचं आहे. ब्रश कितीही चांगला असला तरी तो बदलायला हवाच. इतक्या दिवसांत ब्रश बदलला नाही तर त्याचे अनेक घातक परिणाम होऊ शकतात. आपण सकाळी ब्रश करतो तेव्हा आपले तोंड स्वच्छ होते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुमचा ब्रश चांगला असावा. ब्रश खूप कठीण किंवा खूप मऊ नसावा. कडक ब्रशपेक्षा मऊ ब्रश जास्त फायदेशीर आहे. ब्रशचे दात तुटले असतील, तर तो ब्रश ताबडतोब बदला. टूथब्रश खूप कठीण झाला असेल आणि हिरड्यांना टोचत असेल तर तो ताबडतोब बदला.
आठवड्यातून एकदा टूथब्रश सॅनिटाइज करणे महत्वाचे आहे. ज्या स्टँडमध्ये ते ठेवले आहे ते देखील स्वच्छ करणे आवश्यक आहे. टूथब्रश आठवड्यातून एकदा गरम पाण्याने स्वच्छ करा. असे केल्याने बॅक्टेरिया टूथब्रशमध्ये प्रवेश करणार नाहीत.
डॉक्टर म्हणतात की, जास्तीत जास्त तीन ते चार महिन्यांत तुमचा टूथब्रश बदलला नाही तर सर्वप्रथम तुमच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होईल. टूथब्रशचे दात कमकुवत झाल्याने, तुमच्या दातांमधील घाण काढू शकणार नाही. यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये असंख्य बॅक्टेरिया आणि विषाणू राहतील. या सर्वांमुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होतील. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.