दिवसातून इतके पाणी प्या, त्वचा चमकेल आणि निरोगी राहील!

आपल्या शरीराला प्रामुख्याने पाण्याची गरज ही खूप असते. पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असल्यामुळे, शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, ज्यामध्ये फेस मास्क आणि महागड्या उत्पादनांचा समावेश असतो, परंतु शरीराला हायड्रेट ठेवल्याशिवाय, चेहऱ्यावर अपेक्षित चमक मिळवता येत नाही याकडे आपण दुर्लक्ष करतो.

त्वचेची योग्य पीएच पातळी असणे खूप महत्वाचे आहे. जास्त पीएचमुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेचा पीएच राखण्यासाठीही पाणी पिणे हे खूपच फायदेशीर ठरते. शरीरात विषारी पदार्थांच्या उपस्थितीमुळे मुरुम, ऍलर्जी, तेलकट त्वचा होऊ शकते. हे विष बाहेर टाकण्यासाठी पाणी देखील प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाहीत. त्वचेचा तजेला टिकविण्यासाठी कोमट पाणी पिणे हे सर्वाधिक गरजेचे आहे.

तुम्हाला चहा किंवा काॅफी वारंवार पिण्याची सवय असेल तर, त्याआधी किमान एक ग्लास पाणी प्या. डिटाॅक्स केलेले पाणी पिण्यामुळे त्वचेला तजेला येतो. वयोमानानुसार, त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. पण, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो. त्वचेचा रक्तसंचयही चांगला वाढण्यासाठी पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे. पाणी पिण्यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो आणि त्वचेचा रंगातही सुधार होतो.

दिवसातून किती ग्लास पाणी प्यावे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय, वजन, उंची आणि त्वचेसाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा, चमक आणि तसेच त्वचेचे आरोग्यही उत्तम टिकून राहते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)