Pahalgam Terror Attack – लष्कर, CRPF आणि पोलिसांचा सतत पहारा असताना भर दिवसा हल्ला धक्कादायक!

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र ही घटना जेथे घडली आहे, त्या बैसरन खोऱ्यात तिथे लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचा 24 पहारा असतो. असं असतानाही दहशतवाद्यांनी हा हल्ला कसा काय केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचबाबत बोलताना पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या आहेत की, “बैसरनसारख्या पर्यटन केंद्रात दहशतवादी हल्ला, जिथे सुरक्षा दल सतत तैनात असतात, हे अत्यंत धक्कादायक आहे.”

‘एनआयए’शी बोलताना इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या की, “बैसरनसारख्या पर्यटन केंद्रात दहशतवादी हल्ला, जिथे सुरक्षा दल सतत तैनात असतात, हे अत्यंत धक्कादायक आहे. हा केवळ पर्यटकांवर हल्ला नाही तर तो काश्मिरी संस्कृतीवरही हल्ला आहे. मी या हल्ल्याचा निषेध करते आणि आज ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते”