खूशखबर! 24, 25, 31 डिसेंबरला रात्रभर बार सुरू राहणार

नाताळसह नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे. या तीन दिवशी वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. खुल्या जागेत होणाऱ्या संगीत रजनीसाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्ष स्वागताच्या पार्ट्या जोरात रंगणार आहेत.