संतोष देशमुख हत्येचे भयावह फोटो व्हायरल…अजून किती पुरावे हवे? जनतेचा सवाल

संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. संताष देशमूख यांना क्रूर वागणूक देत त्यांची हत्या करण्यात आली. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनतेच्याही संतापाच्या उद्रेक झाला आहे. अजून किती पुरावे हवे आहेत. एवढे सर्व असतानाही आरोप वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक देण्यात येते. या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या मंत्र्यांचा अजूनही राजीनामा घेण्यात आलेला नाही, अशी जनतेची भावना होत आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले फोटो भयावह आहेत. संतोष देशमुख यांचे पकडे काढणे. त्यांना मारहाण करणे, तसेच एखाद्याची हत्या करताना त्याची मजा घेणे याहून क्रूर काय असेल. हे फोटो बघून अनेकांना अश्रू अनावर झाले. तसेच संतोष देशमुख यांचा छळ होत असताना मारोकरी आसुरी आनंद घेत असल्याचे फोटोत दिसत आहे. या फोटोमुळे जनतेतील संताप उफाळून आला आहे.