
गर्भनिरोधक गोळ्या जास्त घेताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या गोळ्या खाऊन शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात आणि त्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. सगळ्यात जास्त वापरणारी हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या असून ज्याचा वापर लाखो महिला करत असतात. नुकताच याबाबत एका संशोधनात खुलासा करण्यात आला.
ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार,डेन्मार्कमधील महिलांवर एक संशोधन करण्यात आले ज्यामध्ये संशोधकांनी डेन्मार्कमधील 20 लाखांहून अधिक महिलांवर 10 वर्षांहून अधिक काळ संशोधन केले. ज्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या आहेत. जे लाखो महिला वापरत असल्याचे संशोधनात आढळून आले. मात्र डॉक्टरांनी औषधे लिहून देण्यापूर्वी संभाव्य धोके विचारात घेतले पाहिजेत. संशोधकांना असे आढळून आले की सर्वात जास्त वापरले जाणारे हार्मोनल गर्भनिरोधक म्हणजे एकत्रित इस्ट्रोजेन-प्रोजेस्टिन गोळी.
त्यानंतर संशोधकांना असे आढळून आले की या गोळ्यांमुळे इस्केमिक स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो. संशोधकांनी सांगितले की, या निकालांमुळे एका वर्षासाठी एकत्रित गोळी वापरणाऱ्या प्रत्येक 4 हजार 760 महिलांमागे एक अतिरिक्त स्ट्रोक आणि प्रत्येक 10 हजार महिलांमागे एक अतिरिक्त हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. त्यांनी यावर भर दिला की जरी धोका कमी असला तरी, या आजारांचा व्यापक वापर आणि तीव्रता लक्षात घेता, हार्मोनल गर्भनिरोधक लिहून देताना डॉक्टरांनी संभाव्य जोखीम विचारात घेतल्या पाहिजेत.