शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कालिना विधानसभा मतदारसंघातील दहावीच्या 650 गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा वाकोला येथे भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, भेटवस्तू, बुकेबरोबरच 80 ते 97 टक्के गुण मिळवणाऱया 34 विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुलांच्या यशात सिंहाचा वाटा असणाऱया पालकांनाही व्यासपीठावर बोलावून सन्मानित करण्यात आले. कालिना विधानसभेच्या वतीने शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी या गुणगौरव सोहळय़ाचे आयोजन पेले होते. सुप्रीमो फाऊंडेशन कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेत शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थी परीक्षा देतात आणि अपेक्षित यश मिळवतात. कालिना विधानसभेतील 650 विद्यार्थ्यांनीही झोकून देऊन मेहनत केली. त्याच मेहनतीचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी 80 ते 97 टक्के मिळवत घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाचे शिक्षक, शाळा आणि पालकांनी काwतुक केलेच, पण कालिना विधानसभेच्या वतीने शिवसेनेनेही या विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेत रविवारी वाकोला येथे मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. यावेळी शिक्षिका शैलजा मुळे यांनी अत्यंत परखड शब्दांत, पण तेवढय़ाच खेळीमेळीने वातावरण निर्मिती करून वेगळय़ा दहावीनंतरच्या करीअर वाटांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रसन्ना संत यांनी बहारदार सूत्रसंचालन करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, उपविभागप्रमुख राजू परब, बळीराम घाग, विधानसभा संघटक हर्षदा परब, महिला उपविभागप्रमुख साधना डाळ, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कालिना विधानसभा ः प्रथम क्रमांक सुयशा सिंह (97.20 टक्के), द्वितीय क्रमांक प्रिशा लोबो (96.4 टक्के), तृतीय क्रमांक समिधा इल्ले (96.3 टक्के). कालिना विधानसभा (कुर्ला विभाग) ः प्रथम क्रमांक दिव्या गुरव (93 टक्के), द्वितीय क्रमांक रश्मी परब (92.40 टक्के), तिसरा क्रमांक वैष्णवी गुप्ता आणि अथर्व भोसले (92.20 टक्के). शाखांनुसार बक्षिसे ः n शाखा क्रमांक 88 ः मानसी चवंडे, इर्शिता क्षीरसागर (95.6), लावण्य वाघ (94.20), कार्तिक धनोरिया (93.80). n शाखा क्रमांक 89 ः वैशाली गोलप (96), मिताली नारकर (95.4 टक्के), सुष्टी जाधव (92.8 टक्के). n शाखा क्रमांक 90 ः ईव्हा वधान (96.6), रसिका शिंदे (94 टक्के), अवनी रमोला (92.20). n शाखा क्रमांक 91 ः आर्यन देवकाते (96 टक्के), आयेशा वाघधरे (93.8), आर्या रणपिसे (92.8 टक्के). n शाखा क्रमांक 165 ः सुमेधा चौहान (98.4 टक्के), दिशांत द्विवेदी (88.2), अंशिका शर्मा (87 टक्के). n शाखा क्रमांक 166 ः गुरसिमरकाwर (91.6), संचिता हळदणकर, श्लोक गोळे, यश रक्षे, साहील खांडेकर. n शाखा क्रमांक 167 ः समृद्धी कुडवसकर (90.4), तेजल परब (87 टक्के), आर्यन तारळकर (86.7).
n शाखा क्रमांक 168 ः सोहम मोरे (90.8), हर्ष गायकवाड (90.40), रिपांशी सिंह (89.40).