Honey Bee Attack – अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 50 जण जखमी

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना जयपूरमध्ये घडली. मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींना सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जयपूरच्या अंबर परिसरातील पिली की तलाई येथे सोमवारी एका व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह गावकरी जमले होते. अंत्यसंस्कारादरम्यान आगीमुळे मधमाशा पोळ्यातून बाहेर आल्या आणि नागरिकांवर हल्ला केला. यात 50 जण जखमी झाले, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर अंतिम शर्मा यांनी दिली.