![Honda NX200](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Honda-NX200-696x447.jpg)
Honda Motorcycle & Scooter India ने आपली नवीन बाईक Honda NX200 लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्ससह इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. या बाईकचे डिझाईन स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. ही बाईक कंपनीच्या प्रीमियम डीलरशिपवरच उपलब्ध असेल. नवीन Honda NX200 ची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
Honda NX200 फीचर्स
नवीन Honda NX200 मध्ये नवीन TFT डिस्प्ले आणि ड्युअल-चॅनल ABS सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे. Honda ने आपल्या CB200X चे रीब्रँड NX200 नावाने केले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Honda NX200 मध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील असेल. यामध्ये, रायडर्सना कॉल/मेसेज अलर्टसारखे स्मार्ट फीचर्स मिळतात.
इंजिन
Honda NX200 मध्ये 184 cc, सिंगल-सिलेंडर इंजिनचे देण्यात आले आहे. हे इंजिन 12.5 kW ची पॉवर आणि 15.7 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
सेफ्टी फीचर्स
ही बाईक डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. होंडाच्या प्रीमियम डीलरशिपवर याची बुकिंग सुरू झाली आहे. याची डिलिव्हरी मार्च 2024 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.