
दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱया गृहनिर्माण सोसायटय़ांमधील घरमालकांना आता 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरावा लागणार आहे. याकरिता गृहनिर्माण संस्थेची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवी. या सोसायटीतील एखादा फ्लॅट मालक दरमहा साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असेल, तर केवळ 7,500 रुपयांपेक्षा जास्त रकमेवरच नव्हे तर संपूर्ण मेंटेनन्सच्या रकमेवर 18 टक्के जीएसटी लागू होणार आहे. या निर्णयामुळे पै-पै करून हक्काचे घर घेतलेल्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.