Summer Tips- उन्हाळ्यात त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन बघा

उन्हाळ्यात केवळ चेहराच नाही तर हात आणि पायांची त्वचाही निस्तेज होऊ लागतात. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही काही  घरगुती उपाय करून पाहू शकता. कोपर आणि गुडघ्यांची त्वचा काळी पडणे ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे, जी पुरुषांसोबतच महिलांमध्येही दिसून येते.

कोपर आणि गुडघ्यांची त्वचा काळी होण्यापासून वाचवण्यासाठी, सनस्क्रीन लोशन वापरावे आणि त्वचा उन्हात झाकून ठेवण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय, आठवड्यातून एकदा चांगल्या स्क्रबने त्वचेला स्क्रब करावे आणि या भागांची त्वचा मॉइश्चरायझ ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

टॅनिंगपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्याघरी करता येतील अशा काही टिप्स जाणून घ्या

बेकिंग सोडा वापरा

पिगमेंटेशन दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा. हे एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहे जे मृत त्वचेच्या पेशी आणि त्वचेवरीलअशुद्धता काढून टाकते आणि त्वचा उजळण्यास मदत करते. दुधात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवून ती गुडघे, कोपर आणि बोटांना लावा. काही वेळ गोलाकार हालचालीत मालिश करा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा नारळ तेल लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने त्वचा टॅनिंग मुक्त होण्यास मदत होते.

 

 

अॅपल सायडर व्हिनेगर रेसिपी

कोपर, गुडघे आणि बोटांच्या टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर देखील खूप प्रभावी आहे. सायडर व्हिनेगर आणि पाणी एकत्र करुन टॅनिंग असलेल्या त्वचेवर लावा. ते सुकले की पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

 

 

 

दही पॅक लावा

दही हे टॅनिंग काढून टाकण्यासाठी आणि त्वचेला उजळ करण्यासाठी देखील एक उत्तम घटक आहे. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. दह्यात बेसन, हळद आणि थोडे लिंबू घाला. नंतर हे सर्व मिश्रण त्वचेवर लावा आणि 20 मिनिटे मालिश केल्यानंतर स्वच्छ करा. तुम्ही ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. आणि तुम्हाला ते चेहऱ्यावर लावायचे असेल तर लिंबाचा वापर करु नका.

 

मधाचा पॅक लावा

गुडघे आणि कोपरांचा टॅनिंग दूर करण्यासाठी, मधात लिंबाचा रस मिक्स करा नंतर त्यामध्ये साखर घाला आणि काळेपणा असलेल्या भागावर स्क्रब करा. यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातील आणि त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल आणि त्वचेचा टॅनिंग दूर होईल.

 

 

बटाट्याच्या रसाचा वापर करा

घरी सहज उपलब्ध होणारा बटाटा ब्लीचिंगसाठी काम करतो. बटाट्याच्या रसात लिंबू आणि टोमॅटोचा रस मिसळा. त्यामध्ये कोरफडीचा रस घालून नंतर त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिक्स करा ही पेस्ट गुडघे, कोपर आणि हाताच्या बोटांना लावा. 20 मिनिटांनी, हातांनी हलक्या पाण्याने मसाज करा आणि नंतर स्पंजने स्वच्छ करा. यामुळे लवकरात लवकर टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)