
असं म्हणतात, की मायग्रेनचं दुखणं एकदा पाठीशी लागलं की ते दूर होत नाही. मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचाच एक प्रकार. आपण मायग्रेन पूर्णपणे दूर करू शकत नाही. परंतु काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करून आपण मायग्रेनवर नियंत्रण नक्कीच मिळवु शकतो. आपल्यापैकी अनेकांना मायग्रेनच्या त्रासाला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते. खास त्यांच्यासाठी मायग्रेनवरर अगदी साधे सोपे उपाय. मायग्रेन असलेल्यांनी खासकरून आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे.
ड्रायफ्रूट्समध्ये मॅग्नीशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबरीने न्यूट्रिएंट्सचे प्रमाणही मुबलक असते. म्हणूनच ड्रायफ्रूट्स हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेतच, त्याहीबरोबरीने मायग्रेन त्रासावर उपचार म्हणूनदेखील उपयुक्त आहेत. ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यदायी स्नॅक म्हणूनही आपण करू शकतो. आपल्या जवळ छोट्या डब्यात आपण ड्रायफ्रूट्स सोबत ठेवावे. म्हणजे मायग्रेनचा त्रास सुरु झाल्यावर किमान आपण ड्रायफ्रुटस् खाऊ शकतो.
सॅल्मन नावाचा मासा हा एक मायग्रेनवर अतिशय गुणकारी आहे. या माश्यामध्ये ओमेगा –3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे मायग्रेनने त्रस्त असलेल्यांसाठी हा मासा अत्यंत फायदेशीर आहे. त्याचबरोबरीने मायग्रेनचा त्रास कमी करण्यास सॅल्मनची उत्तम मदत होते.
हिरव्या पालेभाज्या या आपल्या आहारात समाविष्ट असाव्यात. यामुळे मायग्रेनवर आपण मात करू शकतो. हिरव्या भाज्या विशेष फायदेशीर असतात. पालक हे फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी यांचा उत्तम स्त्रोत्र आहे. तसेच पालकमध्ये मॅग्नीशियमचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळेच मायग्रेनशी लढण्यास पालकची मदत होते. शिवाय पालक आहारात समाविष्ट असेल तर त्याचे खूप फायदेच आहेत.
मुख्य म्हणजे आपण दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे. पाण्यामुळे आपल्याला मायग्रेनच्या वेदनांचा संभव कमी होतो. मायग्रेनचा त्रास घालवण्यासाठी पाणी अधिक प्रमाणात प्या. हा एक मुख्य प्रभावी उपाय आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)