
प्रत्येक ऋतूत कुठे ना कुठे पाली घरात दिसू लागतात. उन्हाळ्यामध्ये बाथरूम, स्वयंपाकघर, भिंती आणि सिलिंगवर दिसू लागतात. सर्वात मोठी भीती म्हणजे पाल एखाद्या अन्नपदार्थात पडू शकते त्यामुळेच पालीपासून विषबाधा होण्याचा संभव असतो. स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपण पालीला पळवून लावू शकतो. पाली घरातील अशा ठिकाणी असतात, ज्या ठिकाणी लहान किटक खायला मिळतात, म्हणून घरातील कोपरे स्वच्छ ठेवावे. उन्हाळा येताच पालींचा त्रास होत असेल तर, या घरगुती पदार्थांचा वापर करुन पालींना पळवून लावू शकता.
जेवणात वापरला जाणारा लसूण घरातून पालींना पळवून लावण्यासाठी बेस्ट उपाय आहे. लसणाचा तीव्र वास येतो, त्यामुळे पाली येण्यापासून रोखले जाते. तसेच लसणाचा रस काढून, कांद्याच्या रसात मिसळून हे मिश्रण कोपऱ्यामध्ये फवारावे.
पाली पळवण्यासाठी, पाण्यात काळी मिरी पावडर घाला, ती स्प्रे बाटलीत ठेवा आणि जिथे पाली येतात तिथे फवारणी करा. यामुळे पालींची संख्या कमी होण्यास मदत होते.
अंड्याचे कवच हे पालींसाठी रामबाण उपाय आहे. अंडी खात असाल तर वरच्या बाजूला एक लहान छिद्र करून ती फोडा आणि रिकामे कवच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरातील पाली कमी होण्यास खूप मदत होते.
घरात थोडासा धूर डास, माश्या आणि इतर कीटकांना दूर ठेवतो. तुम्ही दररोज तुमच्या घरात काही लवंग आणि तमालपत्र आणि काही कापूर जाळा. ते हळूहळू जळू द्या. यामुळे तुमच्या घरात धूर पसरेल, याच्या वासामुळे पाली पळून जातील. हे नियमितपणे केल्याने तुम्हाला कीटक आणि डासांपासूनही मुक्ती मिळेल.