![Dalai Lama](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/05/dali-lama-696x446.jpg)
बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा यांना गृह मंत्रालयाने झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. गुप्तचर विभागाकडून (आयबी) मिळालेल्या धोक्याच्या सुचनेमुळे हा निर्णय घेत लामा यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी एकूण 33 सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. आयबीच्या धमकीच्या अहवालाच्या आधारे त्यांना ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
या वाढीव सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत 89 वर्षांच्या दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी एकूण 33 सुरक्षा कर्मचारी असतील. त्यात त्यांच्या निवासस्थानी तैनात केलेले सशस्त्र स्थिर रक्षक, 24 तास सुरक्षा देणारे खाजगी सुरक्षा अधिकारी आणि शिफ्टमध्ये सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, प्रशिक्षित ड्रायव्हर्स आणि देखरेख करणारे कर्मचारी यांच्यावर लामा यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.
या 33 सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये 10 सशस्त्र स्थिर रक्षकांचा समावेश आहे. ते लामा यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असतील. तसेच 6 राउंड-डोअर पीएसओ, तीन शिफ्टमध्ये 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो, शिफ्टमध्ये 2 वॉचर्स आणि 3 प्रशिक्षित ड्रायव्हर्स चोवीस तास सुरक्षा कर्मचारी म्हणून उपस्थित असतील. गुप्तचर यंत्रणेकडून मिळणारी माहिती आणि विविध अहवालातून मिळणाऱ्या सूचनांचा विचार करत केंद्र सरकारकडून देशातील काही लोकांना विशेष प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. त्यात एक्स, वाय, वाय प्लस, झेड, झेड प्लस सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे. याशिवाय, पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा पुरवण्यात येते.