सजवा स्वप्नातले घर

>>सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर

घर ताब्यात घेतल्यापासून ते घराची सजावट सुरू करेपर्यंत कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊ यात. घराचा ताबा घेताना आपल्याला बिल्डरने काय काय सुविधा सांगितलेल्या होत्या त्याची यादी घेऊन जावी व एक-एक गोष्ट नीट तपासावी. म्हणजेच बाथरूम फिटिंग कोणत्या ब्रँडचे सांगितले होते,

मॉडय़ुलर किचन असेल तर ते व्यवस्थित आहे ना, सगळे नीट छान वापरता येतेय ना हे बघावे. टाइल्स किंवा अजून काही सुविधा सांगितल्या असतील तर त्या दिल्या आहेत ना ते पाहावे. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे सगळय़ा कामाचा दर्जा चांगला असावा, जेणेकरून इंटिरिअरचे नियोजन करताना या गोष्टी आपण टाळू शकतो व तोच खर्च दुसऱया कोणत्या तरी इंटिरिअरच्या संबंधित कामाकरिता वापरू शकतो. टाइल्सला कुङ्गे व्रॅक वगैरे नाही आहेत ना, कुङ्गे गळती वगैरे नाहीत ना, या गोष्टी पाहून ताबा घ्यावा.

आता आपण आपली इंटिरिअर संबंधित यादी करावी. बिल्डरने काही सुविधा दिल्यात त्या सोडून आपल्याला काय काय हवेय त्याची यादी तयार करावी. आपल्याला कोणत्या स्टाइलचे डिझाइन हवे आहे ते ङ्खरवावे आपला होमवर्क नीट असेल तर आपल्या इंटिरिअर डिझायनरला आपल्याला काय हवे ते नीट सांगू शकतो. रंगसंगती, लाइट्स, पडदे वगैरे सगळय़ा गोष्टी कशा हव्यात याचा साधारण अंदाज त्यांना द्यावा.

यानंतर त्यांच्याकडून डिझाइन प्लॅन करून घ्यावा व मग पुढची डिटेल ड्रॉइंग व थ्रीडी डिझाइन घ्या. जर तुम्ही सामान आधी निवडले असेल तर ते थ्रीडीमध्ये टाकून त्याचा लुक कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतील. आज आपण घराचा ताबा घेण्यापासून ते काम सुरू होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली. यापुढली प्रत्येक सदरात आपण सगळ्या इंटिरिअर प्रक्रिया, स्टाईल्स, रंग, लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टांविषयी जाणून घेऊया. चला तर मग तुमचे घर तुमच्या नजरेतून छान सजवूया.

वेळ घ्या पण…

मी नेहमी सांगतो की, घाईगडबडीत काम सुरू करण्यापेक्षा प्लांनिंग स्टेजला वेळ घ्या. कागदावर सगळे मनासारखे झाल्यावर ते सत्यात उतरवायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल वेळ वाया जातोय, पण तो वेळ सार्थकी लागतोय. कारण सगळे चित्र स्पष्ट असल्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. काम सुरळीत होते.