आता चोरी करतोय, महिन्यात परत करेन
घरात चोरी झाल्यानंतर पोलीस केस, आरडाओरड आणि चोराच्या नावाने खडे पह्डले जातात. परंतु तामीळनाडूमध्ये एका चोराने चोरीनंतर लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. घरातील 60 हजार रुपये रोख, कानातील फुले आणि काही चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या. पोलिसांना या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत चोराने लिहिले होते, ‘मला माफ करा. मी हे सर्व एका महिन्यात परत करेन. माझ्या घरी कोणीतरी आजारी आहे. त्यामुळे मी ही चोरी करतोय,’ असे लिहिले.
33 कोटी जिंकताच हार्ट अॅटॅकने मृत्यू
पॅसिनोमध्ये जुगार खेळणाऱया एका व्यक्तीने तब्बल 33.76 कोटी रुपये जिंकले. या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. पैसे जिंकल्याचा आनंद साजरा करताना अचानक या व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. सिंगापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही व्यक्ती जमिनीवर कोसळताच स्टाफ गोंधळला, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डेटवर जाणं तरुणाला पडलं महागात
टिंडर या डेटींग अॅपवर भेटलेल्या मुलीसोबत डेटवर जाणे एका व्यक्तीला चांगलंच महागात पडले. त्याला रेस्टॉरटने 44 हजारांचे बिल दिले. बिलावरील आकडा पाहून तो उडालाच. टींडर स्पॅम कसा झाला हे सांगताना ‘रेडिट’वर या बिलाचा पह्टो शेअर करण्यात आलाय. त्यावर नेटीजन्स जोरदार कमेंट्स करत आहेत. त्या व्यक्तीने पोलिसांना बोलावले. फक्त चार हजार रुपये कमी झाले. मात्र त्याला 40 हजार रुपये बिल भरावे लागले.
फ्रान्समधील जादूची तलवार गायब
फ्रान्समध्ये 1300 वर्षे जुनी तलवार गायब झाली आहे. ही तलवार इतकी वर्षे खडकात गाडली होती. या तलवारीवर कोणत्याही हवामानाचा परिणाम झाला नव्हता, पण आता ती अचानक गायब झाली आहे. पोलिसांनी तलवार चोरीला गेल्याचा संशय बाळगून तपास सुरू केला आहे. ही तलवार फ्रेंच एक्सपॅलिबर म्हणून प्रसिद्ध आहे.
हिंदुस्थानी मुलांना इंटर्नशिपची संधी
न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने अमेरिकन पंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी शोधत असलेल्या आणि कायदा आणि वैद्यकशास्त्राविषयी ज्ञान मिळवू इच्छिणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ‘पोर्टल’ तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या तपशीलानुसार थेट पंपन्यांकडे अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे.
कामाचा तणाव; रोबोटची आत्महत्या
दक्षिण कोरियातील एका रोबोटने कामाचा ताण वाढला म्हणून आत्महत्या केली. जिन्यावरून उडी घेत या रोबोटने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे अवघे तंत्रज्ञान हादरले. रोबोटने आत्महत्या केलेली ही पहिलीच घटना आहे. दक्षिण कोरियात जगातील सर्वात जास्त रोबोट वापरले जातात. 10 कर्मचाऱयांमागे एक रोबोट त्या ठिकाणी काम करतात.
28 सौंदर्यवती एका फ्रेममध्ये!
‘मिस टीन इंटरनॅशनल 2024’ ची स्पर्धा अंतिम टप्यात आहे. या स्पर्धेत 28 देशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला. या सर्वांनी प्रेमाचे प्रतिक आग्य्रातील ताजमहलसमोर पह्टोसेशन केले. 7 जुलैला अंतिम फेरी असून या दिवशी 2023 मधील मिस टीन इंटरनॅशनल विजेती बारबरा पराग्गा आपला मुकूट नव्या विश्वसुंदरीच्या डोक्यावर ठेवेल.
माल वाहतुकीतून रेल्वेने कमावले 15 हजार कोटी
हिंदुस्थानी रेल्वेने जून 2024 मध्ये 135.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक करून तब्बल 14,798.11 कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वेने मालवाहतुकीतून चांगली कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीतून मिळणाऱया नफ्यात 11.12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दुबईच्या मॉलमध्येही यूपीआय पेमेंटची सुविधा
दुबई मॉल आणि मॉल ऑफ द एमिरेट्ससह किरकोळ आउटलेट्स आणि डायनिंग आउटलेट्स तसेच पर्यटन आणि मनोरंजनाच्या ठिकाणी यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यूएईमध्ये यूपीआय पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्सद्वारे क्यूआर कोड-आधारित पेमेंट सुरू केले आहे.
ऑस्ट्रेलियन संसदेच्या छतावर पॅलेस्टाईन समर्थकाचे आंदोलन
ऑस्ट्रेलियात गुरुवारी पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांनी संसदेच्या छतावर ‘फ्री पॅलेस्टाईन’ चे पोस्टर्स फडकवले. काळे कपडे घातलेले चार लोक संसदेत घुसले आणि छतावर गेले आणि फ्री पॅलेस्टाईनच्या घोषणा देऊ लागले. त्यांच्या हातात ‘फ्रॉम रिवर टू सी, फिलिस्तीन विल बी फ्री’ असे लिहिलेले पोस्टर्स होते.
अंतराळात जाऊन स्पेसवॉक करण्याचे स्वप्न पूर्ण होणार
भविष्यात अंतराळात जाऊन स्पेस वॉक करायची कुणाची इच्छा असेल तर पूर्ण होणार आहे. कारण लवकरच यासंदर्भातील मिशन लाँच होणार आहे. 31 जुलै ही कमर्शिअल स्पेसवॉकची लॉंिचग डेट ठरवण्यात आलेय. मिशनचे नाव पोलारिस डॉन अॅस्ट्रोनॉट असे आहे. जेरेड इसाकमन या अब्जाधीशने मिशनला फंडींग केले आहे.
हॉलीवूड स्टार जस्टिन बिबर मुंबईत पोहोचला
जगप्रसिद्ध गायक, हॉलीवूड स्टार जस्टिन बिबर मुंबईत दाखल झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात परफॉर्म्स करण्यासाठी जस्टिन बिबर मुंबईत दाखल झाला आहे. या परफॉर्म्ससाठी जस्टीन बिबरला अंबानी कुटुंबांनी 10 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 74 कोटी रुपये मोजले आहे.