हॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांचा अखेर आठ वर्षांच्या घटस्फोट झाला आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ आणि वादग्रस्त घटस्फोट आहे. तब्बल 8 वर्षानंतर दोघांच्या घटस्फोटावर तोडगा काढला आहे. दोघांच्या घटस्फोट सेटलमेंटवर झाला असून 30 डिसेंबर रोजी दोघांनी विभक्त होण्याच्या अटींवर स्वाक्षरी केली.
अँजेलिना जोलीचे वकील जेम्स सायमन यांनी सोमवारी या जोडप्याच्या घटस्फोटाची पुष्टी केली. “आठ वर्षांपूर्वी, अँजेलिनाने पिटपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केला होता,” जोलीने 19 सप्टेंबर 2016 रोजी पिटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिने आणि मुलांनी मिस्टर पिटसोबत शेअर केलेली सर्व मालमत्ता सोडून दिली आहे. ती आता संपूर्ण लक्ष कुटुंब आणि शांततेवर देणार आहे.
2016 साली अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. मात्र दोघांमध्ये मालमत्तेच्या वाटपावरुन तिढा कायम होता. त्यामुळे त्यांची डिवोर्स सेटलमेंट होत नव्हती. आता डिवोर्स दाखल झाल्याच्या 8 वर्षानंतर त्यांची सेटलमेंट झाली आहे. 2014 मध्ये अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचं लग्न झालं होतं. मात्र काही वर्षानंतरच त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही सहा मुलं आहेत.