मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर 7 किमी लांब रांगा, सलग सुट्ट्यांमुळे चाकरमानी बाहेर पडले फिरायला

शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सलग सुट्टय़ा आल्याने अनेकांनी कुटुंबकबिल्यासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखला खरा, पण त्यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडीने तब्बल तीन तास रोखले. त्याशिवाय बोरघाटातील खंडाळा टनेलजवळ देखभाल-दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. महामार्गावर खालापूर टोलनाका ते खंडाळा दरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली. भरउन्हात प्रवासी हैराण झाले होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडीचा शुक्रवारी राज्यपाल सी. राधाकृष्णन यांनाही फटका बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने अखेर हा ताफा जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पुढे रवाना झाला.