
थंडाई हे उन्हाळ्याच्या दिवसात खूप चविष्ट, ताजेतवाने आणि ऊर्जा देणारे पेय आहे. दररोज सकाळी एक ग्लास थंडाई प्यायलात तर उन्हामुळे होणारे रक्तस्त्राव यासारख्या समस्यांपासून संरक्षण होईल. तयार थंडाई बाजारातूनही खरेदी करता येते, परंतु घरी बनवलेली थंडाई भेसळ नसलेली असल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. थंडाईमुळे शरीराला उर्जा तर मिळतेच, सोबत शरीराला थंडावाही मिळतो. थंडाईमध्ये असलेले गरम मसाले हेच थंडाईचे खरे वैशिष्ट्य आहे. थंडाई पिण्यामुळे उन्हाळ्यात होणारी जळजळ आणि पित्त नाहीसे होण्यास मदत होते.
थंडाई
थंडाई रेसिपीसाठी साहित्य
बदाम – ⅓ कप
खरबूजाच्या बिया – ¼ कप
बडीशेप – ¼ कप
खसखस – ¼ कप
वेलची – 15 (सोललेली)
काळी मिरी – 1 टीस्पून
साखर – 2.5 कप
गुलाबजल – 1 टेबलस्पून
थंडाई कशी बनवायची
एका भांड्यात साखर आणि दीड कप पाणी मिसळा 5 ते 6 मिनिटे उकळवा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर बडीशेप, काळी मिरी, बदाम, खरबूजाच्या बिया, वेलची आणि खसखस स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना प्रत्येकी एक तास पाण्यात भिजवा. (रात्रभर भिजवु शकता )
सर्व ड्रायफ्रूटस् मधून जास्तीचे पाणी काढून टाका. बदाम सोलून घ्या. सर्व ड्रायफ्रुटस् एकत्र बारीक करा. या गोष्टी बारीक करण्यासाठी पाण्याऐवजी साखरेचे पाणी वापरा.
साखरेच्या पाण्यात बारीक वाटलेले मिश्रण गाळून घ्या. गुलाबजल घालावे आता थंडाई तयार आहे, थंडाई हवाबंद बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही ते १ महिन्यापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.
जेव्हा तुम्हाला थंडाई प्यायची असेल तेव्हा गरजेनुसार बर्फ आणि दूध घाला आणि थंडाई प्या.