होलार समाजाने अडविला मुख्यमंत्र्यांचा रस्ता, विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर मध्ये दाखल होत असताना अखिल भारतीय होलार समाजाच्या युवकांनी शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांचा ताफा ठाकरे चौकातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने जात असताना होलार समाजाच्या युवकांनी शिंदे यांचा ताफा अडवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांनी गाडीची काच खाली करुन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून भेटायला येण्याची विनंती केली. तेंव्हा कार्यकर्ते बाजूला झाले. भर चौकात गाडी अडविल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.