महाराष्ट्राचा ज्युनियर मुलांच्या संघाची घोडदौड

हॉकी महाराष्ट्राने एकतर्फी लढतीत हॉकी गुजरातचा 14-0 गोलफरकाने धुव्वा उडवित दुसऱया हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष पश्चिम विभागीय स्पर्धेत अंतिम फेरीच्या दिशेने दमदार घोडदौड सुरूच ठेवली आहे. राजनांदगाव (छत्तीसगड) येथे सुरू असलेल्या सहा संघांचा समावेश असलेल्या राऊंड रॉबिन लीगमध्ये महाराष्ट्रकडून कार्तिक पठारे (6 गोल) आणि विशाल मंदाडे (5 गोल) यांनी सर्वोत्तम कामगिरी करताना गुजरातचा सहज पराभव केला.