HMPV Virus News Maharashtra- नागपुरात आढळले HMPV चे दोन रुग्ण

चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या HMPV व्हायरसे आता हिंदुस्थानात शिरकाव केला आहे. गुजरात, तामिळनाडू नंतर आता नागपुरातही HMPV व्हायरचे दोन रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. यासाठी खासगी रुग्णालयात चाचणी केल्यानंतर 3 जानेवारीला चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. सध्या दोघांवरही उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.