चीनमध्ये मेडिकल इमर्जन्सी घोषित? कोविडसह अनेक व्हायरसचा एकाचवेळी प्रसार, हॉस्पिटल्समध्ये बेड मिळेना

चीनमधून संपूर्ण जगात कोरोनोचा फैलाव झाला होता. आता चीनमध्ये पुन्हा एका व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनचे हॉस्पिटल्स रुग्णांनी भरल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे चीनने मेडिकल एमरजन्सी घोषित केल्याचाही दावा केला जात आहे.

कोरोना जाऊन पाच वर्ष झाली. त्यानंतर आता चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार चीनमध्ये अनेक हॉस्पिटल्स रुग्णांनी भरली आहेत. चीनमध्ये HMPV, मायकोप्लास्मपा न्युमोनिया आणि कोरोना व्हायरस पसरला आहे. इतकंच नाही तर चीनमध्ये मेडिकल इमरजेन्सीही घोषित केल्याचा दावा केला जात आहे, पण या दाव्याला चीनने दुजोरा दिलेला नाही.

हिवाळ्यात पसरणारा HMPV हा प्रमुख व्हायरस आहे. या व्हायरसमध्ये फ्लूसारखी लक्षणं असतात. खोकला, ताप, नाक बद होणे, घसा खवखवणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.