चीनमधील वाढत्या प्रकरणांमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) आणि श्वसन संस्थेवर परिणाम करणाऱ्या विषाणूंनी धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता दिल्लीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी एक अॅडव्हायझरी जारी केली आहे.
गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) प्रकरणे आणि लॅबद्वारे पुष्टी करण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा प्रकरणांचे तपशीलवार रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
अशा संशयित रुग्णांना पॅरासिटामॉल, अँटीहिस्टामाइन्स, ब्रॉन्कोडायलेटर्स आणि कफ सिरप यांसारख्या औषधांचा उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच गरज असल्यास ऑक्सिजन पुरविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म (IHIP) पोर्टलवर इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) ची प्रकरणे त्वरित नोंदविण्याचे निर्देश देखील रुग्णालयांना देण्यात आले आहेत. संशयित रुग्णांना विलगिकरण आणि सार्वजनिक खबरदारी घेण्याचे अन्य पर्याय देखील अनिवार्य करण्यात आले आहेत.
चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याच्या वृत्तानंतर ही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. IDSP, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडील अपडेट्स पाहता 2 जानेवारी 2025 पर्यंत हिंदुस्थानात श्वसनाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची माहिती अधिकारी देतात.